Posts

Showing posts from May, 2021

आठवण

तुझी आठवण येते तेव्हा.. देवा एकाच मागणी तिची पापणी भरू दे माझ्या नावाचा एक तरी थेंब तिच्या नयनी तरु दे.. रात अशी ही तंद्रित पापणिहि बघ लवते आहे ह्रुदयाचे ठोके हळुवार सांगे कुणीतरी माझ्यासाठी जागत आहे तुझी आठवण येते तेव्हा तु दिलेली प्रेमपत्रे वाचत बसतो तु येणार नाहीस माहित असतं डोळे पुसुन मग स्वतःवरच हसतो.. एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल तू समोर असतेस तेंव्हा बोलू देत नाहीस तू समोर नसतेस तेंव्हा झोपू देत नाहीस तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय माझ्या शब्दांना अजुन तरी काहीच अर्थ नाही.