दुष्काळ
अरे पावसा पावसा ये ना जरा
दुःखाच्या ओंजळीत पडणा जरा
करपलेल्या धरती माय वर आस दाखविना जरा
आनंदाचा क्षण आण जरा
आरे पावसा पावसा ये ना जरा. !!१!!
सुकलेल्या धरती मातेवर सुख दाखव ना जरा
तिला झालेल्या जखमा भरून आण ना जरा.
अरे पावसा पावसा ये ना जरा. !!२!!
पाणी पाणी म्हणून फिरणाऱ्या पक्षांना दुःख सहन होईल का जरा
पाणी दे तहान भागव आशीर्वाद देतील तुला जरा जरा
अरे पावसा पावसा ये ना जरा !!३!!
तू नाही आलास तर लोक म्हणतात
निसर्गाने कोप केला जरा जरा
मी म्हणतो येना जरा लवकर हिरव कर धरतीमातेला जरा जरा
अरे पावसा पावसा ये ना जरा
Nice thoughts
ReplyDeleteSuper
Nice
ReplyDelete